भयभीत होऊ नका, आपल्यासाठी उद्धारक जन्मास आला आहे.
साधारण दोन हजार वर्षांपूर्वी ह्या जगात एक महान आश्चर्यकर्म झाले.
होय! परमेश्वर, ज्याने जगाला निर्माण केले आणि अजूनही चालवीत आहे, तो ह्या जगात शूद्र मानव रूप घेऊन जन्मास आला.
किती हे आश्चर्य की एका अदृश्य परमेश्वराने मानव रूप धारण केले आणि अगदी आमच्या-तुमच्या सारखेच ह्या जगात जन्माला आला.
सगळं जग ह्या आश्यर्यकर्माला ख्रिस्तमस दिवस म्हणून साजर करतो.
परमेश्वराला मनुष्याच्या रूपात जन्म का घ्यावा लागला ?
देवाच्या स्वर्गदूताने ह्याची सुवार्ता दुनियेला घोषित केली, कारण मिसर देशातील बेथलेहेम नामक छोट्याश्या गावी येशू ख्रिस्त बालक होऊन जन्मास आला.
“आज दाविदाच्या घरात तुम्हा करता उद्धारक जन्मास आला आहे; तो ख्रिस्त प्रभू आहे.” (लूक २:११)
प्रिय मित्रांनो, प्रभू येशूचा जन्म तुमच्या-आमच्या साठी मानव रूपात झाला. काय तुम्ही आश्यर्यचकित होऊन विचारता आहात,” काय माझ्या साठी?”
होय, तुमच्या-माझ्यासाठीच, आम्हाला वाचविण्यासाठी, येशू ख्रिस्त उद्धारक बनून जगात बालक म्हणून जन्मास आला
का?
पाप आणि पापांच्या गुलामीमुळे, तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हालाही शांती नव्हती
येशू ख्रिस्त जो आपला उद्धारक आहे, तो आम्हाला पापांपासून सोडविण्यास आणि पवित्र जीवन देण्यास ह्या जगात जन्मास आला.
येशू ख्रिस्त उद्धारक, तो आमच्या दुःखाला आणि व्याधीला बरे करण्यासाठी आणि आपल्याला एक आनंदी जीवन देण्यासाठी ह्या जगात जन्मास आला
येशू ख्रिस्त उद्धारक, तुम्हास वाचविण्यासाठी दुःखाला, आसवांना दूर करून आपण जे ओझ्याने दबलेले आहोत त्या सर्वास एक धन्य जीवन देण्यासाठी जन्मास आला.
येशू ख्रिस्त उद्धारक, ज्याने स्वतःहून क्रुसावर स्वतःला बलिदान म्हणून अर्पण केले. त्याने आमच्या पापांना, व्याधींना, दुःखांच्या ओड्याला स्वतःवर लादले. येशू ख्रिस्त एकमात्र असा मानव आहे, ज्याला क्रुसावर खिळले गेले, त्याने आपले पवित्र रक्त सांडविले, जो मृत्यू पावला आणि पुन्हा जीवित झाला. तोच मात्र तुम्हास वाचवू शकतो
येशूचे रक्त आम्हाला सर्व पापांतून मुक्त करते (१ योहान १:७)
येशू ख्रिस्त तुमच्या – माझ्यासाठी जन्मास आला, तुमच्या साठी मृत पावला आणि आता जीवित असून तुमचा उद्धार करण्यासाठी तुमच्या जवळ उभा आहे.
काय आपण आपल्या हृदयांत येशूचा स्वीकार
कराल?
पूर्ण निष्ठेने ही प्रार्थना करा “प्रिय प्रभू येशू, मी विश्वास करतो / करते की तू माझ्यासाठी ह्या जगात आलास आणि तू मला वाचविण्यासाठी क्रुसावर प्राण दिलास. मी तुला माझ्या हृदयांत आमंत्रित करतो. मी आपल्या पापांचा पश्चताप करतो. माझ्या सर्व पापांची क्षमा कर आणि मला एक धन्य नवीन जीवन दे.” परमेश्वर तुमच्या जीवनाला बदलेल आणि तुम्हाला परिपूर्ण शांतीने भरेल.
तुम्हाला उद्धारक येशू ख्रिस्ताविषयी, अधिक जाणून घ्यायचे आसल्यास, आम्हास लिहा. आम्ही येशू ख्रिस्ताच्या जीवनावरील पुस्तिका तुम्हाला मोफत घरपोच करू.
आमचा पत्ता आहे:
प्रकाशनः येशू मुक्त करतो.